प्राचार्य मनोगत

 

                       प्राचार्य श्रीकांत निवृत्ती लांडगे 

(कोळा विद्यामंदिर प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज कोळा)

मुख्याध्यापक / प्राचार्य मनोगत

          मी  श्रीकांत निवृत्ती लांडगे विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज  कोळा  येथे मुख्याध्यापक/प्राचार्य म्हणून काम करीत आहे. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थीच्या सोयीसाठी कोळा विद्यामंदिर ही शाखा २८ मे १९५९ रोजी सुरू केली. सध्या कोळा विद्यामंदिरला ६६ वर्ष पुर्ण होत आहेत. गेल्या ६५ वर्षामध्ये शाळेच्या प्रगती साठी माजी मुख्याध्यापक/प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-य़ानी आपले बहूमोल योगदान दिलेले आहे. शाळेची एक सुसज्य देखणी इमारत असून प्रशालेमध्ये इ. ५ वी ते इ. १२ वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रशालेत मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाचे  इ. ५ वी ते इ. १० वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. ज्युनिअर कॉलेज मध्ये कला व शास्त्र शाखेचे वर्ग सुरु आहेत. शाळेची इ. ५ वी ते इ. १२ वी ची विद्यार्थी संख्या गेल्या पाच वर्षामध्ये १४०० च्या आसपास आहे. ग्रामीण भागाचा विचार करता विद्यार्थी संख्येमध्ये ही सर्व प्रथम आहे. एक नामांकित शाळा अशी कोळा विद्यामंदिरची ख्याती आहे. प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये ३८ शिक्षक व १२ शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत प्रशाला व ज्युनिअर मधील सर्व शिक्षक अतिशय कष्टाळू व मनमिळावू आहेत. त्याचबरोबर विद्यार्थीची फार काळजी घेणारे आहेत.  शिक्षकेत्तर वर्ग सुध्दा अतिशय प्रामाणिकपणे काम करीत आहेत. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या या प्रामाणिकपने काम करण्यामुळे शाळेच्या विद्यार्थी संख्येमध्ये नेहमीच भर पडत आहे. कोळा विद्यामंदिर येथे जवळपासच्या ७ गावामधून विद्यार्थी चालत/ सायकल /बस मधून ये-जा करतात. यामध्ये कोळा व परिसरामधील जुनोनी ,पाचेगाव , गोडवाडी ,कराडवाडी ,कोंबडवाडी व तिप्पेहळी या गावातून विद्यार्थी ये-जा करतात .

     शाळेची गुणवत्ता तर खूपच आहे शाळेमध्ये सर्व बाहय परीक्षांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये महत्वाची N.M.M.S.,N.T.S.,M.T.S.,चित्रकला परीक्षा  गेल्याच वर्षी Scholarship मध्ये कोळा विद्यामंदिरमध्ये इ. ५ वी चे २  विद्यार्थी व ८ वी चे ५ विद्यार्थी Scholarship  प्राप्त झाले होते. इ.८ वी वी साठी असणा-या N.M.M.S या परीक्षेत दर वर्षी चांगल्या संख्येने मुले यशस्वी होतात. या वर्षी सुध्दा ९ विद्यार्थी हे गुणवत्ता प्राप्त झालेले आहेत. इ. १० वी निकाल नेहमीच ९५ टक्के च्या वर लागत असतो. दरवर्षी जवळपास २३० च्या वरती इ. १० वी  ला विद्यार्थी असतात.सेमी माध्यमाचा निकाल हा १०० टक्के व मराठी माध्यमाचा निकाल ९५ टक्के च्या आसपास असतो. मागील  वर्षीचा म्हणजे सन २०२४-२५ चा इ. १० वी सेमी माध्यमाचा निकाल १०० टक्के व मराठी माध्यमाचा ९५.४१ टक्के लागला आहे. या शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच खेळातही ही मुले जिल्हा ,विभागस्तर व राज्यस्तरावर खेळून यशस्वी झालेली आहेत. सर्व प्रकारच्या स्पर्धेमध्ये मुले आणि मुली सहभागी असतात. शाळेत एक छानसी संगणक लॅब असून इ. ५ वी ते इ. १२ वी चे विद्यार्थी त्याचा लाभ घेतात. इ. ५ वी ते इ. ८ वी  मध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी  अप्रगत वर्ग दरवर्षी शाळेच्या अगोदर १ तास भरविले जातात.

          प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी  वर्षभरामध्ये करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले जाते. त्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते. या मार्गदर्शन शिबीरामुळेच आमच्या शाळेचे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये विविध पदावर काम करीत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने न्यायाधीश ,डॉक्टर ,इंजिनिअरर्स ,वित्त लेखाधिकारी, विक्रीकर आयुक्त, विक्रीकर निरीक्षक ,पी.एस.आय ,प्राध्यापक,प्राथमिक शिक्षक , पोलीस व आर्मी इ. ही बाब आमच्या शाळेसाठी व संस्थेसाठी भूषणावह आहे.  याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

       समारोपामध्ये मी मुख्याध्यापक/प्राचार्य म्हणून एवढेच सांगतो की माझ्यावर दिलेली जबाबदारी मी समर्थपणे स्विकारली आहे. शाळेचा २ वर्षात बरीचशी प्रगती करण्याचा प्रयत्न मी सात्यत्याने करत आहे. या सर्व शाळेच्या यशामध्ये सर्वश्री संस्थेचे अध्यक्ष मा.प्रा.पी.सी.झपके सर , संस्था सचिव म. शं .घोंगडे सर , संस्था सहसचिव मा.प्रशुद्धचंद्र झपके साहेब व संस्था कार्यकारणी सदस्य मा. विश्वेशजी झपके साहेब व संस्था कार्यकारणी सर्व सदस्य तसेच शिक्षक  व शिक्षकेत्तर कर्मचारी  यांचे खुप खुप सहकार्य असल्यामुळेच मी हे सर्व करू शकत आहे. मी मुख्याध्यापक या नात्याने सर्व संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी  यांचा ऋणी आहे.

 

!! धन्यवाद !!

 

 
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry