शाळा ,कॉलेजमधील संस्कारामुळेच चमकले अनेक खेळाडू -सचिन खिलारी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या स्नेहसंमेलनास आजपासून आजपासून सुरवात विज्ञान प्रज्ञा परीक्षेत सांगोला विद्यामंदिरचे घवघवीत यश सांगोला विद्यामंदिरमध्ये स्थानिक भूजल समस्या व व्यवस्थापनसंदर्भात प्रशिक्षण राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत महेक मुलाणी राज्यात द्वितीय
कै. गुरूवर्य बापूसाहेबांची राष्ट्रपिता म. गांधी यांच्या विचारांवर मोठी श्रदधा होती. 1942 च्या चलेजाव आंदोलनात सहभाग घेतला होता त्याबद्द्रल ब्रिटीश सरकारने त्यांना येरवडा पुणे येथील कारागॄहात स्थान बद्ध केले होते. त्याठिकाणी त्यांना व. पू. साने गुरूजी व इतर देशभक्ताचा सहवास लाभला. साने गुरूजीच्या प्रत्यक्ष सहवासातून झालेल्या संस्कारातून कै. गुरूवर्य बापूसाहेंबाना अंतर्बाहय प्रेरित केले. हीच प्रेरक शक्ती घेऊन 3 मार्च 1952 रोजी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची व विद्यामंदीरची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी माध्य. शिक्षणाची कसलीच सोय या तालुक्यामध्ये नसल्यामुळे अत्यंत गरजू गरीब व होतकरू विद्याध्र्याना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. समाजऋणांची जाणीव असणाया कै. गुरूवर्य बापूसाहेबांनी हे समाजऋण फेडण्यासाठी या पंढरीच्या वाटेवर विद्यामंदीरची मुहुर्तमेढ रोवून माध्य.| शिक्षणांची दारे सर्वासाठी खुली केली.