सांगोला विद्यामंदिरचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण प्रा .राजेंद्र ठोंबरे यांचा साहित्यिक प्रवास कौतुकास्पद-सयाजीराजे मोकाशी सांगोल्यात संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमीस सुरवात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यामंदिरचे सुयश विज्ञान प्रदर्शनात माने,नवले,काटे द्वितीय
कै. गुरूवर्य बापूसाहेबांची राष्ट्रपिता म. गांधी यांच्या विचारांवर मोठी श्रदधा होती. 1942 च्या चलेजाव आंदोलनात सहभाग घेतला होता त्याबद्द्रल ब्रिटीश सरकारने त्यांना येरवडा पुणे येथील कारागॄहात स्थान बद्ध केले होते. त्याठिकाणी त्यांना व. पू. साने गुरूजी व इतर देशभक्ताचा सहवास लाभला. साने गुरूजीच्या प्रत्यक्ष सहवासातून झालेल्या संस्कारातून कै. गुरूवर्य बापूसाहेंबाना अंतर्बाहय प्रेरित केले. हीच प्रेरक शक्ती घेऊन 3 मार्च 1952 रोजी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची व विद्यामंदीरची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी माध्य. शिक्षणाची कसलीच सोय या तालुक्यामध्ये नसल्यामुळे अत्यंत गरजू गरीब व होतकरू विद्याध्र्याना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. समाजऋणांची जाणीव असणाया कै. गुरूवर्य बापूसाहेबांनी हे समाजऋण फेडण्यासाठी या पंढरीच्या वाटेवर विद्यामंदीरची मुहुर्तमेढ रोवून माध्य.| शिक्षणांची दारे सर्वासाठी खुली केली.