21 जुलै 1922 - जन्म - सांगोला, जि. सोलापूर. प्राथमिक शिक्षण सांगोला येथे पूर्ण, माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्याने पूर्वीच्या व्ही. जे. स्कूल व आताच्या लोकमान्य विद्यालय, पंढरपूर येथे. 1927 ते 1939 - प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची पूर्तता. 1939 ते 1942 - पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षणाची सुरूवात, म. गांधींची चले जाव चळवळी मध्ये विद्यार्थी संघटनेच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड. 1942 ते 1943 - स्वातंत्र चळवळीत भाग म्हणून येरवडा कारगॄहात स्थानबध्द - सुटका. 1942 ते 1945 - राष्ट्रसेवा दलाशी संबंध 1943 ते 1947 - बी. ए. एल. बी. शिक्षण पूर्ण 1945 - विवाहबध्द 1948 नंतर काँग्रेस सेवा दलाशी संबंध